सरकारनामा ब्यूरो
भारताची लष्करी ताकद, परंपरा, सांस्कृतिक वारसा रविवारी प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीतील कर्तव्य पथावर पाहण्याचा आनंद देशवासियांनी घेतला.
भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांचे अलिशान बग्गीतून कर्तव्य पथावर आगमन झाले.
2025 च्या परेडमध्ये अनेक राज्ये, केंद्रशासित प्रदेश, केंद्रीय मंत्रालये, विभाग आणि संस्थांच्या पथकांनी संचलनात सहभाग घेतला.
परेड दरम्यान बुलेट रॅली, लॅडर सॅल्यूट, थ्री पीक डेव्हिल फॉर्मेशन, शत्रुजीत, मर्क्युरी पीक, इन्फो वॉरियर्स, लोटस आणि ह्युमन पिरॅमिडने सलामीला सुरुवात करण्यात आली.
आकाशातून ध्वजाला सलामी देणाऱ्या आर्मीच्या विमानांसह हेलिकॉप्टरने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
कर्तव्य पथावर वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम करण्यात आले. यात एका समुहाने पारंपरिक वेशभुषा करुन नृत्य सादर केले.
कर्तव्य पथावर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारताचे संविधान दर्शवणारा रथ आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
परेडमध्ये अनेक महिलांच्या नेतृत्वाने अनेक तुकडी, फ्लोट्स आणि बँड सहभागी झाले होते. रिॲक्शन व्हेईकल फोर्स (हेवी) नंदीघोषचे नेतृत्व मेजर राधिका सेन करत होत्या.