Vijaykumar Dudhale
प्रजासत्ताकदिनानिमित्त सोलापूर शहर पोलिस कवायत मैदान येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.
ध्वजवंदन झाल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जनतेला संबोधित करत सोलापूरकरांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
देशातील प्रत्येकाने आपली भूमिका नीट बजावली तर 15 ऑगस्ट 2047 रोजी भारत जगातील एक नंबरचा देश होईल, असेही पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले
कुंभारीच्या ‘रे-नगर’मधील 15 हजार घरांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्या कार्यक्रमासाठी दिवसरात्र राबणाऱ्या अधिकाऱ्यांचा चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज सन्मान करण्यात आला.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शीतल तेली-उलगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, पोलिस आयुक्त राजेंद्र माने, पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांचा यावेळी पालकमंत्र्यांनी सन्मान केला.
प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीमधून 80 महिलांना स्वयंरोजगारासाठी निधी उपलब्ध करून दिला.
चंद्रकांत पाटील यांनी आज उजनी धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय जाहीर केला.
उजनी धरणातून शेतीसाठी चौथे आवर्तन सोडताना आपल्याला खूप विचार करावा लागेल, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
प्रजासत्ताक दिनी 'कर्तव्यपथा'वर पाहायला मिळाली विविधतेतील एकता...