Deepak Kulkarni
आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलो आहोत. रोजच्या खर्चातून जो पैसा वाचेल तो बँकेत ठेवायचा.
मोठ्या शहरांपासून ते आता गावपातळीवरही सरकारी,कोऑपरेटिव्ह यांच्यासह खासगी पतसंस्थाही उपलब्ध झाल्या आहेत.
पण आपण ज्या बँकांमध्ये पैसे ठेवतो आहोत, ती खरंच सर्वार्थाने सुरक्षित आहे का, असा प्रश्न अनेकदा ठेवीदारांच्या मनात निर्माण होतो.
सर्वसामान्य जनतेचा डोळे झाकून विश्वास हा सरकारी बँकांवर असतो. तिथे आपला पैसा सर्वात सुरक्षित आहे असा त्यांचं म्हणणं असतं.
देशातील सर्वात सुरक्षित असणाऱ्या 3 बँकांची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली आहे.
या सुरक्षित बँकांच्या यादीत सरकारी बँक म्हणून आरबीआयनं स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) नावाची घोषणा केली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं बाकी दोन सर्वातसुरक्षित बँका म्हणून खासगी बँकांची निवड केली आहे. त्यात HDFC बँकचा नंबर लागतो.
ICICI बँकदेखील आरबीआयच्या नियमांनुसार देशातील सर्वात सुरक्षित बँकेपैकी एक असल्याची माहिती समोर आली आहे.
आरबीआयनं या तीन बँका भारतीय अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असून कितीही वाईट वेळ आली तर त्या बुडणार नसल्याचं सांगितलं आहे.