गावच्या सरपंचापासून ते महापालिकेच्या महापौरांपर्यंत..कोण कुणाकडे राजीनामा देतात?

Ganesh Sonawane

सरपंच

गावच्या सरपंचाची निवड थेट जनतेतून होते. सरपंचाला राजीनामा द्यायचा असल्यास पंचायत समितीच्या सभापतींकडे लिखित स्वरूपात (स्वतःच्या सहीने) द्यावा लागतो.

Sarpanch resignation | Sarkarnama

उपसरपंच

तर, उपसरपंचाची निवड ग्रामपंचायतीच्या निवडून आलेल्या सदस्यांमधून होते. उपसरपंचाला राजीनामा द्यायचा असल्यास तो सरपंचाकडे द्यावा लागतो.

Deputy Sarpanch | Sarkarnama

पंचायत समिती सभापती

पंचायत समिती सभापतींना राजीनामा द्यायचा असल्यास तो जिल्हा परिषद अध्यक्षांकडे द्यावा लागतो. तर पंचायत समिती उपसभापतींना पंचायत समिती सभापतींकडे राजीनामा द्यावा लागतो

Panchayat Samiti Chairman resignation

जिल्हा परिषद अध्यक्ष

जिल्हा परिषद अध्यक्ष हे आपला राजीनामा विभागीय आयुक्तांकडे देतात. तर जिल्हा परिषद उपाध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्षांकडे राजीनामा देतात.

Zilla Parishad President resignation | Sarkarnama

नगराध्यक्ष

नगरपालिका किंवा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांना राजीनामा द्यायचा असेल तर तो थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे लिखित स्वरूपात (स्वतःच्या सहीनिशी) द्यावा लागतो.

Municipal Council President resignation | Sarkarnama

उपनगराध्यक्ष

नगरपालिका किंवा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षांना नगराध्यक्षाकडे राजीनामा सादर करावा लागतो.

Deputy Municipal Council President resignation | Sarkarnama

महापौर

महापौराची निवड ही महानगरपालिकेच्या निवडून आलेल्या नगरसेवकांमधून होते. त्यांना राजीनामा द्यायचा असल्यास विभागीय आयुक्तांकडे द्यावा लागतो.

Mayor resignation | Sarkarnama

उपमहापौर

तर, उपमहापौराची निवड देखील नगरसेवकांमधूनच होते. उपमहापौर आपला राजीनामा महापौरांकडे लिखित स्वरूपात (स्वतःच्या सहीने) सादर करतात.

Deputy Mayor resignation | Sarkarnama

NEXT : ज्यांच्या एका फोटोवरून महाराष्ट्राचं राजकारण पेटलं, ते टीपू सुलतान कोण होते?

येथे क्लिक करा