Jagdish Patil
7 राज्यांतील 13 जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. यामध्ये काँग्रेसला 4, टीएमसी 4, भाजप 2, आप-DMK-अपक्ष उमेदवारांने प्रत्येकी 1 जागा जिंकली आहे.
हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सुखू यांच्या पत्नी कमलेश ठाकूर यांनी देहरामधून भाजपचा 9265 मतांनी पराभव केला.
CM सखू यांचा जिल्हा असलेल्या हमीरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे आशिष शर्मा विजयी झाले.
पंजाबमधील जालंधर पश्चिम विधानसभेची जागा 'आप'ने जिंकली आहे. आपचे उमेदवार मोहिंदर भगत 37,325 मतांनी विजयी झाले आहेत.
बद्रीनाथ मतदारसंघात काँग्रेसच्या लखपतसिंग बुटोला यांनी भाजपच्या राजेंद्र भंडारी यांचा 5 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. राजेंद्र भंडारी हे आधी येथून आमदार होते, पण नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने राज्यातील चार विधानसभा जागांवर विजय मिळवला. रायगंज, बागडा, राणाघाट आणि माणिकतला या जागांवर TMCचे उमेदवार विजयी झाले.
बिहारच्या रुपौली येथे जेडीयू आणि आरजेडीसारख्या पक्षांना मागे टाकत अपक्ष उमेदवार शंकर सिंह विजयी झाले आहेत.
तामिळनाडूतील विकरावंडी मतदारसंघात सत्ताधारी द्रमुकने विजय मिळवला आहे. तर मध्य प्रदेशातील अमरवाडा मतदारसंघातील मतमोजणीत भाजपचे कमलेश शहा विजयी झाले आहेत.