सरकारनामा ब्यूरो
निवृत्त IPS अधिकारी आचार्य किशोर यांचे आज रविवार (ता.29) सकाळी वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले.
किशोर कुणाल हे मुळचे बिहारमधील असून त्यांचे शालेय शिक्षण मुझफ्फरपूर जिल्ह्यातील बरूराज या गावात झाले. त्यांनी पटणा विद्यापीठातून इतिहास आणि संस्कृत या विषयात पदवी मिळवली.
किशोर कुणाल यांनी UPSCची परीक्षा पास केली आणि गुजरात केडरचे IPS अधिकारी झाले.
किशोर कुणाल यांच पहिली पोस्टिंग गुजरातमधील आणंद येथे करण्यात आली. तर 1978 पर्यंत त्यांनी अहमदाबादचे पोलीस उपायुक्त म्हणून काम केले.
2000 मध्ये त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर ते दरभंगा येथील संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू झाले. बिहार राज्य धार्मिक मंडळाचे प्रशासक म्हणूनही काम केले.
पटना येथील प्रसिद्ध महावीर मंदिर न्यास समितीचे ते सचिव होते. त्याचबरोबर अनेक शाळा आणि कर्करोग रुग्णालयातील कामगिरी त्यांच्यावर होती.
याच महावीर ट्रस्टने महावीर कॅन्सर इन्स्टिट्यूट, महावीर आरोग्य, महावीर नेत्रालया या संस्थांची स्थापना केली आहे.
किशोर कुणाल हे अनेक सामाजिक कार्यांमध्ये सक्रीय होते. या सेवेतील योगदानासाठी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते त्यांना भगवान महावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.