Vijaykumar Dudhale
गोव्यातील दक्षिण गोवा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार पल्लवी श्रीनिवास डेम्पो या सर्वांत श्रीमंत आहेत. त्यांच्याकडे 13 अब्ज 61 कोटी 68 लाख 38 हजार 731 रुपये संपत्ती आहे.
ग्वाल्हेर संस्थानचे ज्योतिरादित्य शिंदे हेही अब्जाधीश आहेत. मध्य प्रदेशातील गुना मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे तिकिटावर निवडणूक लढविणारे ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे चार अब्ज 24 कोटी 74 लाख 94 हजार 078 एवढी संपत्ती आहे.
कोल्हापूर संस्थानचे शाहू महाराज छत्रपती हे महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याकडे तीन अब्ज 42 कोटी 86 लाख 68 हजारांची मालमत्ता आहे.
कर्नाटकातील दावणगिरी मतदारसंघातून काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढविणाऱ्या डॉ. प्रभा मल्लिकार्जून ह्यांची संपत्ती दोन अब्ज 41 कोटी 28 लाख तीन हजार 910 रुपये एवढी आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज, खासदार उदयनराजे भोसले हे कमळ चिन्हावर सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याकडे दोन अब्ज 23 कोटी, 12 लाख, 33 हजार 931 रुपयांची मालमत्ता आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर हेही अब्जाधीश उमेदवार आहेत. त्यांच्याकडे दोन अब्ज पाच कोटी 82 लाख 58 हजार 375 रुपयांची मालमत्ता आहे.
उत्तर प्रदेशातील बरेली मतदारसंघातून प्रवीण सिंह अरॉन हे समाजवादी पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवित आहेत. त्यांच्याकडे एक अब्ज, 82 कोटी 85 लाख 24 हजार 671 रुपयांची प्रॉपर्टी आहे.
बारामती लोकसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचीही संपत्ती एक अब्ज 66 कोटी 51 लाख 86 हजार 348 रुपये एवढी आहे.