Vijaykumar Dudhale
माजी केंद्रीय मंत्री तथा शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल ह्या पंजाबच्या भटिंडा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे 198 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
ओडिशातील केंद्रपाडा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे वैजयंत पांडा हे 148 कोटी रुपयांचे मालक आहेत.
चंडीगड लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले संजय टंडन यांच्याकडे 111 कोटी रुपयांची मालमत्ता आहे.
हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह यांची 100 कोटींची संपत्ती आहे.
मंडी लोकसभा मतदारसंघातून राजकीय क्षेत्रात आपले नशिब अजमावणारी सिने अभिनेत्री कंगणा राणावत ही भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. ती 91 कोटी रुपयांची मालकीण आहे.
झारखंडमधील गोड्डा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणारे भाजपचे ज्येष्ठ नेते निशिकांत दुबे यांच्या 74 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्या पत्नी परिनित कौर ह्या पंजाबमधील पटियाला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याकडे ६० कोटी रुपयांची मालमत्ता आहे.
पंजाबमधील संंगरुर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढवणारे सुखपाल सिंग खैरा हे 50 कोटींचे मालक आहेत.