Lok Sabha Election 2024 : सहाव्या टप्प्यातील श्रीमंत आठ उमेदवार...

Vijaykumar Dudhale

नवीन जिंदाल

उद्योगपती नवीन जिंदाल हे भारतीय जनता पक्षाकडून हरियाणातील कुरुक्षेत्र मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यांनी उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार ते 1241कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत.

Naveen Jindal | Sarkarnama

संतृप्त मिश्रा

आदित्य बिर्ला ग्रुपचे माजी संचालक संतृप्त मिश्रा हे बिजू जनता दलाचे उमेदवार असून त्यांनी ओडिशाच्या कटकमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्याकडे 482 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

Santrupt Misra | Sarkarnama

डॉ. सुशील गुप्ता

शिक्षण क्षेत्रात काम करणारे डॉ. सुशील गुप्ता यांना आम आदमी पक्षाने हरियानातील कुरुक्षेत्र या मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. त्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची 169 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

Dr. Sushil Gupta | Sarkarnama

नैना सिंह चौताला

जननायक जनता पक्षाकडून हरियाणातील हिस्सार या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या नैना सिंह चौताला यांच्याकडे 139 कोटी रुपयांच्या संपत्तीच्या मालकीण आहेत.

Naina Singh Chautala | Sarkarnama

राव इंद्रजित सिंह

हरियाणातील गुडगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणारे राव इंद्रजित सिंह यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे 129 कोटी रुपयांची संपत्ती आहे

Rao Inderjit Singh | Sarkarnama

फौजी जय कंवर त्यागी

गुडगावमधून फौजी जय कंवर त्यागी हे अपक्ष निवडणूक लढवित आहेत. त्यागी हे 113 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक आहेत.

Fauji jai kanwar tyagi | Sarkarnama

मनेका गांधी

उत्तर प्रदेशमधील सुलतानपूर मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर मनेका गांधी निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याकडे 97 कोटींची संपत्ती आहे.

Maneka Gandhi | Sarkarnama

महेंद्र प्रताप सिंह

फरिदाबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविणारे महेंद्र प्रताप सिंह यांच्याकडे 90 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

Mahender Pratap Singh | Sarkarnama

भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात जुळले सूर अन्..! स्वाती मालीवाल-नवीन यांची प्रेमकहाणी

Swati Maliwal | Sarkarnama