Swati Maliwal Love Story : भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात जुळले सूर अन्..! स्वाती मालीवाल-नवीन यांची प्रेमकहाणी

Rajanand More

स्वाती मालीवाल

आम आदमी पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार आणि दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा. आपमधील महत्वाच्या नेत्या.

Swati Maliwal | Sarkarnama

नवीन जयहिंद

मालीवाल यांचे पूर्वाश्रमीचे पती. सध्या हरियाणामध्ये राजकीय-सामाजिक कार्यकर्ते म्हणून कामात सक्रीय आहेत.

Naveen Jaihind | Sarkarnama

आंदोलनात ओळख

नवीन आणि स्वाती यांची ओळख दिल्लीत अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात झाली. इंडिया अगेन्स करप्शन टीममध्ये होते.

Swati Maliwal, Naveen jaihind | Sarkarnama

केजरीवाल यांचे विश्वासू

आंदोलन काळात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही सक्रीय होते. त्यावेळी दोघे केजरीवालांचे विश्वासू होते.

Arvind Kejriwal, Naveen Jaihind | Sarkarnama

प्रेमात रुपांतर

स्वाती आणि नवीन यांच्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. एका आंदोलनात लाठीचार्जमध्ये नवीन यांना वाचवतानाचे स्वाती यांचे फोटो झाले होते व्हायरल.

Swati Maliwal, Naveen Jaihind | Sarkarnama

2012 मध्ये विवाह

आम आदमी पक्षाची स्थापना होण्यापुर्वी दोघांनी 2012 मध्ये विवाह केला. त्यांचा विवाह जुळवण्यात केजरीवाल यांची महत्वाची भूमिका.

Swati Maliwal, Naveen Jaihind | Sarkarnama

आठ वर्षात घटस्फोट

मालीवाल यांचे आपमध्ये राजकीय महत्व वाढत गेल्यानंतर लग्नानंतर आठ वर्षांत म्हणजे 2020 मध्ये घटस्फोट झाला.

Swati Maliwal | Sarkarnama

मालीवाल यांच्या पाठिशी

मालीवाल यांना केजरीवालांच्या पीएने केलेल्या कथित मारहाणीनंतर नवीन त्यांच्यासाठी धावून आले. मालीवाल यांचा मानसिक छळ सुरू असल्याचा आरोप.

Naveen Jaihind | Sarkarnama

NEXT : भाजपमध्ये 75 व्या वर्षी निवृत्त होण्याची अलिखित परंपरा कधी सुरू झाली?