सरकारनामा ब्यूरो
भारताची फाळणी 14 ऑगस्ट 1947 ला झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान 15 ऑगस्टला अस्तित्वात आले.पाकिस्तानात हिंदूंची लोकसंख्या 23 टक्के इतकी होती.पण आता येथे फक्त 2.17 टक्के राहिलेली आहे.
अनेक असे भारतीय लोक आहेत जे वेगवेगळ्या देशात वासतव्यास असून त्याचा करोडोचा व्यवसाय आहे.असेच एक व्यवसायिक आहेत ते म्हणजे दीपक पेरवानी.जाणून घेऊयात ते कोण आहेत?आणि त्याची एकूण संपत्ती किती आहे.
पाकिस्तानातील सिंध प्रांतातील मीरपूर खास येथील रहिवासी असलेले दीपक पेरवानी हे पाकिस्तानातील सर्वात प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक असून ते फॅशन डिजायनर आणि अभिनेते आहेत.
ब्रॅन्ड पेरवानी यांनी 1996ला त्यांचा स्वा:ताचा ब्रॅन्ड 'डीपी' या नावाने सुरु केला होता. हा ब्रॅन्ड आता फक्त पाकिस्तानातच नाही तर,संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे.
फॅशन डिजायनर ब्रॅन्डमध्ये ते मुख्यत: वधू-वर आणि फाॅरमल असे पोशाख तयार करण्यासाठी ओळखला जातो.
2014 मध्ये त्यांची बल्गेरियन फॅशन अवॉर्ड्समध्ये जगातील सहाव्या क्रमांकाचे सर्वोत्तम फॅशन डिझायनर म्हणून निवड करण्यात आली होती. तसेच सर्वात मोठा कुर्ता तयार करून त्यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले.
दीपक यांनी जावेद अख्तर आणि प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी असा अनेक प्रसिद्ध व्यक्तींसोबत काम केले आहे.
2022 ला दीपक पेरवानी यांची एकूण संपत्ती 71कोटी इतकी होती. तसेच त्यांना चीन आणि मलेशियासारखा देशातून बेस्ट फॅशन डिजायनर अवार्ड मिळाला आहे.