Pradeep Pendhare
जमीन लाटण्यासाठी आमदार थोरवेंकडून धमकी दिली जात असल्याचा आरोप अभिनेत्री हेमांगी राव यांनी केला आहे.
खालापूर पोलिस ठाण्यात चार वेळा तक्रार करून देखील आमदार थोरवेंविरोधात दखल घेत नसल्याचा आरोप अभिनेत्री हेमांगी राव यांनी केला आहे.
डाॅ. विनोद राव आणि त्यांची पत्नी अभिनेत्री हेमांगी यांनी त्यांच्या कंपनीतद्वारे लोकांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आमदार थोरवे यांनी केला आहे.
अभिनेत्री हेमांगी राव यांनी कंपनीच्या नावावर लोकांची कमीत कमी नऊ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आमदार थोरवे यांनी म्हटले.
याशिवाय राव आणि अभिनेत्री हेमांगी यांनी जागा 11 कोटींना बिल्डरला करार करून विकल्याचाही आरोप आमदार थोरवे यांनी केला.
आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांचा सुतारवाडीत बसलेला आजचा औरंगजेब, अशी 5 मार्चला जाहीर टीका केल्याने राजकारणही तापले होते.
हेमांगी राव यांनी 'चिंतामणी', 'गोट्या', 'रिश्ते', 'माझा छकुला', 'बोकड', अशा मराठी-हिंदी चित्रपट आणि मालिकांमधून काम केले आहे.
हेमांगी राव यांचे प्राथमिक शिक्षण रायगड जिल्ह्यातील पेणच्या लोकमान्य कन्या विद्यालयात, तर मुंबई विद्यापीठातून 'एम. काॅम'ची पदवी घेतली आहे.