Deepak Kulkarni
आमदार सीता सोरेन यांनी झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचा राजीनामा दिला आहे.
यासोबतच त्यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
सीता या झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख शिबू सोरेन यांच्या सून असून, माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या भावजय आहेत.
सीता यांच्या राजीनाम्यामुळे सोरेन कुटुंबात फूट पडल्याची चर्चा आहे.
सीता सोरेन यांनी दिल्ली येथे भाजप प्रवेश केला.
त्या दुमका येथून भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
त्या आतापर्यंत तीनदा आमदार राहिल्या आहेत.
हेमंत सोरेन मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्या पक्षावर नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे.
सीता सोरेन यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच पक्षावर गंभीर आरोप केला आहे.
काही दिवसांपूर्वी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना अटक केल्यामुळे राजकीय खळबळ उडाली असतानाच आता भाजपने मोठा डाव टाकला आहे. सोरेन यांच्या भावजय सीता सोरेन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
R