सरकारनामा ब्यूरो
भारतीय उद्योगपती आणि राजकारणी सावित्री देवी जिंदाल या ओ.पी. जिंदाल ग्रूपच्या त्या चेअरपर्सन होत्या, सध्या त्या अग्रोहा येथील महाराजा अग्रसेन वैद्यकीय महाविद्यालयाच्या अध्यक्षा आहेत.
रोहिका सायरस मिस्त्री या दिवंगत सायरस मिस्त्री यांच्या पत्नी आहेत, 2022 मध्ये परंपरागत उद्योग साम्राज्यात त्यांना पतीचा वारसा मिळाला आहे.
भारताचे वॉरेन बफेट म्हणून संबोधले जाणारे दिवंगत राकेश झुनझुनवाला यांच्याकडून अब्जावधीचा पोर्टफोलिओ स्टॉक रेखा यांना वारसाहक्काने मिळाला आहे.
भारतीय उद्योजक आणि लेखिका लीना गांधी तिवारी या मुंबईतील बहुराष्ट्रीय फार्मास्युटिकल आणि बायोटेक्नॉलॉजी कंपनी USV प्रायव्हेट लिमिटेडच्या अध्यक्षा आहेत.
भारतातील चौथ्या सर्वात श्रीमंत महिला विनोद राय गुप्ता आणि त्यांचा मुलगा अनिल राय गुप्ता यांची बहुतांश संपत्ती त्यांच्या हॅवेल्स इंडियाच्या मालकीतून आली आहे.
भारतीय स्वयंनिर्मित महिला अब्जाधीशांपैकी एक उद्योगपती फाल्गुनी नायर नायका आणि जीवनशैली रिटेल कंपनीच्या संस्थापिका आणि CEO आहेत.
गोदरेज कुटुंबातील स्मिता कृष्णा गोदरेज या भारतातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक आहेत.
भारतीय अब्जाधीश उद्योगपती आणि सामाजिक कार्यकर्त्या अनु आगा यांनी 1996 ते 2004 या काळात Thermax नावाच्या ऊर्जा आणि पर्यावरण अभियांत्रिकी व्यवसायाचे नेतृत्व केले होते.
भारतीय अब्जाधीश उद्योजक किरण मुझुमदार शॉ बंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या माजी अध्यक्षा आणि बायोकॉन कंपनीच्या कार्यकारी अध्यक्षा तसेच संस्थापिका आहेत.
राधा वेम्बू या भारतीय अब्जाधीश उद्योगपती आहेत. भारतीय सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट झोहो कॉर्पोरेशन कंपनीमधील बहुसंख्य स्टेकच्या त्या मालकीण आहेत.