Roshan More
मध्य प्रदेश केडरची धडाकेबाज IAS अधिकारी रिजू बाफना या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. त्यांचे पूर्वीचे जीवनसाथी असलेले IAS अवी प्रसाद यांनी तिसरे लग्न केले आहे.
अवी प्रसाद आणि रिजू बाफना यांचा प्रेमविवाह असल्याचे सांगितले जाते. मात्र, लग्नाच्या काही वर्षातच त्यांनी घटस्फोट घेतला.
रिजू यांनी 2013 मध्ये आयएएसची परीक्षा पास केली. सध्या त्या मध्य प्रदेशातील शाजापुर जिल्ह्याच्या कलेक्टर आहेत.
त्यांनी दिल्लीच्या किरोडीमल कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले. तर, 2011 मध्ये दिल्ली स्कल ऑफ इकोनॉमिक्समध्ये मास्टर्स केले.
तब्बल 11 वर्षापूर्वी रिजू यांनी त्या अधिकारी असतानाच अश्लील मेसेज करत लैगिंक छळ केल्याचा आरोप मानव अधिकार कमिशनच्या एका अधिकाऱ्यावर केला होता.
रिजू यांनी त्या अधिकाऱ्याची तक्रार आपल्या वरिष्ठांकडे केली होती. त्या अधिकाऱ्यावर न्यायालयात केस दाखल करण्यात आली होती.
तेव्हा कोर्टात साक्ष देण्यासाठी गेल्यानंतर तेथे आलेल्या वाईट अनुभवाबद्दल त्यांनी आपल्या सोशल मीडियामध्ये लिहिले होते. एका अधिकारी महिलेला अशी वागणूक मिळत असेल तर सामन्य महिलांचे काय? असा प्रश्न त्यांनी विचारला होता.