Aslam Shanedivan
भारतीय क्रिकेट संघाचा उदयोन्मुख स्टार रिंकू सिंग उत्तर प्रदेशमधील योगी सरकारमध्ये महत्वाच्या विभागात नवी इनिंग खेळताना दिसेल
योगी सरकारने आंतरराष्ट्रीय पदक विजेता भरती नियमातून त्याची नियुक्ती जिल्हा मूलभूत शिक्षण अधिकारी (BSA) म्हणून केली आहे.
रिंकू सिंगचा जन्म 12 ऑक्टोबर 1997 रोजी अलिगडमधील एका साध्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील खानचंद्र गॅस एजन्सीमध्ये सिलिंडर पुरवत असत.
परिस्थिती हालाकिची असल्याने रिंकूही त्यांनी मदत करत होता. त्याच्या क्रिकेट आवडीनेच त्याला आज वेगळी ओळख मिळाली आहे.
डीपीएस ग्राउंडवर घेतलेल्या 'मॅन ऑफ द सिरीज'च्या किताबानंतर तो आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) चमकला.
केकेआरने आयपीएलमध्ये त्याला मेगा लिलावात 13 कोटींना घेतलं होते. तर तो टीम इंडियाच्या टी20 आणि एकदिवसीय संघातही सामाविष्ट झाला होता.
अलीकडेच रिंकू सिंगने समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोजशी साखरपुडा केला आहे. त्यांचे लग्न याच वर्षीच्या शेवटी होण्याची शक्यता आहे.