भाजप नेत्याच्या थोबाडीत मारण्याचा प्रयत्न; 'या' IAS अधिकाऱ्यावर आरोप

Rajanand More

रिंकु सिंह राही

रिंकु सिंह राही हे 2022 च्या उत्तर प्रदेश केडरचे IAS अधिकारी आहेत. नियुक्तीपासूनच ते विविध कारणांमुळे सातत्याने चर्चेत असतात.

Rinku Singh Rahi | sarkarnama

भाजप नेत्याशी वाद

 यूपीतील जालौनचे उपजिल्हाधिकारी म्हणून ते २९ जूनपर्यंत कार्यरत होते. पण भाजप नेत्यासोबत धक्काबुक्की केल्याने त्यांनी तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

Rinku Singh Rahi | sarkarnama

नेमकं काय घडलं?

रिंकू सिंह आणि भाजपचे ब्लॉक प्रमुख रामराजा निरंजन यांच्यात ता. २३ जून वाद झाला होता. यावेळी रिंकू यांनी त्यांचा हातातील मोबाईल पाडत त्यांना जोरात धक्का दिला होता.

Rinku singh rahi | Sarkarnama

थोबाडीत मारण्याचा प्रयत्न

निरंजन यांच्या तक्रारीनुसार, सिंह यांच्याकडून आपल्या थोबाडीत मारण्याचा प्रयत्न झाला. त्यांचा हात आपल्या चेहऱ्याला स्पर्श करून गेला आणि मोबाईलला लागला, असा त्यांचा दावा आहे.

Rinku Singh Rahi | sarkarnama

काही तासात बदली

रिंकू सिंह यांच्याविषयीचा हा वाद समोर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची काही तासांत बदली केली आहे. यापूर्वीही त्यांच्या वादामुळे दोन ठिकाणी बदल्या झाल्या होत्या.

Rinku Singh Rahi | sarkarnama

धडाडीचे अधिकारी

राज्य सरकारच्या सेवेत मुजप्फरनगर जिल्ह्यात समाज कल्याण अधिकारी असताना रिंकू सिंह यांनी तब्बल 100 कोटी रुपयांचा शिष्यवृत्ती घोटाळा उघडकीस आणला होता.

Rinku Singh Rahi | sarkarnama

जीवघेणा हल्ला

घोटाळा उघड झाल्यानंतर रिंकू यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यांच्यावर सात गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यालाही गोळ्या लागल्या होत्या. त्यातून ते थोडक्यात बचावले.

Rinku Singh Rahi | sarkarnama

असे झाले IAS

हल्ला होऊनही ते थांबले नाहीत. रिंकू सिंह यांनी 2021 मध्ये दिव्यांग कोट्यातून युपीएससीत क्रॅक केली अन् IAS बनले.

Rinku singh rahi | sarkarnama

NEXT : महाराष्ट्रात SIR सुरू; 'या' तारखा लिहून ठेवा, अन्यथा करता येणार नाही मतदान

येथे क्लिक करा.