Rajanand More
साक्षी मलिकने २०१६ च्या रियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवला. ब्राँझ मेडल मिळवत ती भारताची पदक ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली महिला कुस्तीपटू बनली.
साक्षीसह काही महिला कुस्तीपटूंनी काही महिन्यांपूर्वी भारतीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष व भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते.
ब्रिजभूषण सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी महिला कुस्तीपटूंनी केली होती.
ब्रिजभूषण यांच्याविरोधात साक्षीसह इतर कुस्तीपटूही आंदोलनाला बसले होते. देशभरातून अनेकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला.
दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंनी ताब्यात घेत आंदोलन मोडित काढले. त्यानंतर काही दिवसांनी ब्रिजभूषण यांच्यावर गुन्हाही दाखल झाला.
कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सिंह यांची निवड झाली. ते ब्रिजभूषण यांचे निकटवर्तीय आहेत.
संजय सिंह यांच्या निवडीमुळे धक्का बसलेल्या साक्षीने नुकताच कुस्ती सोडण्याचा निर्णय जाहीर केला.
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलेल्या साक्षीला भाजप खासदारांविरोधातील लढ्यात मात्र हार मानावी लागली.
महिला कुस्तीमध्ये देशाचे नाव सातासमुद्रापार पोहचवलेली साक्षी आता विजयी डाव टाकताना कधीच दिसणार नाही.