सरकारनामा ब्यूरो
पूर्वीचे बॉम्बे स्टेट पोलिस म्हणजेच महाराष्ट्र पोलिस दलाचा आज (ता.2 जानेवारी) वर्धापन दिन आहे.
पोलिसांच्या सुमारे 36 तुकड्या असलेला हा देशातील सर्वात मोठा पोलिस विभाग आहे.
17व्या शतकात मुंबईचा परिसर पूर्णपणे पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. त्यावेळी पोर्तुगीजांनी 1661 मध्ये या पोलिस चौकीची स्थापना केली.
मुंबईच्या भागात कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी त्यांनी मूलभूत संरचना तयार करण्यासाठी ही चौकी उभारली.
सिंध प्रांताचे पोलिस हे मुंबई प्रांत पोलिसांपासून वेगळे झाले आणि भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्याचे नाव बदलून बॉम्बे स्टेट पोलिस असे करण्यात आले.
राज्य पुनर्रचना कायदा आल्यानंतर 1956 मध्ये महाराष्ट्रातील मुंबई पोलिस दल हे गुजरात, म्हैसूर आणि कर्नाटक राज्यात विभागले गेले.
ड्यूक ऑफ एडिनबर्गच्या भेटीच्या स्मरणार्थ रॉयल अल्फ्रेड सेलर्स होम इमारत तयार करण्यात यावी अशी कल्पना मांडली आणि ती बांधण्यात आली.
ब्रिटीश राजवटीत, रॉयल अल्फ्रेड सेलर्स होम खलाशांचे घर म्हणून ओळखले जात होते.
बॉम्बे लेजिस्लेटिव्ह कौन्सिलसाठी महाराष्ट्र सरकारने 1928 मध्ये इमारत ताब्यात घेतल्यानंतर महाराष्ट्र पोलिस मुख्यालय म्हणून ओळखू लागले.