Aslam Shanedivan
इकडे तिकडे पडणाऱ्या कचऱ्यामुळे अति सामान्यांपासून मोठ्या पदावर बसलेल्या व्यक्तीपर्यंत सर्वांनाच त्रास होतो
पण आता कचऱ्यापासून सोने बनवले जाईल, असा दावाच भाजपच्या एका मंत्र्याने केला आहे. तर फक्त दावाचा केला नसून तशी मशीन लवकरच तयार होईल असेही सांगण्यात आले आहे
उत्तर प्रदेशच्या योगी सरकारमधील मंत्री धर्मपाल सिंह यांनी याबाबतचा दावा करताना लवकरच मशीन मेरठमध्ये मशीन बसवली जाईल असे म्हटलं आहे
मंत्री धर्मपाल सिंह यांनी याबाबतचा दावा करताना मेरठमध्ये कचऱ्यापासून सोने बनवण्यास सुरुवात होईल असेही म्हटलं आहे
ते मेरठच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असताना कचरा विल्हेवाटीबाबत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना केल्या. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते
याच दौऱ्यात त्यांनी, मेरठमध्ये कचऱ्यापासून सोने करण्यासाठीची मशीन लावले जाईल. सध्या मशीनमध्ये काही त्रुटी असून त्या दुरुस्त केल्या जातायत.
धर्मपाल सिंह बरेलीच्या आओंला मतदारसंघातून पाच वेळा आमदार राहिलेले असून ते योगी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत
लोधी राजपूत समुदायातून असलेले धर्मपाल सिंह हे भाजपचे जुने नेते असून ते कल्याण सिंह यांच्या सरकारमध्येही मंत्री होते. सध्या, ते उत्तर प्रदेशातील पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.