Deepak Kulkarni
दिल्ली दरबारीही प्रचंड वजन, हायकमांडशी थेट कनेक्शन,एकेकाळचा महाराष्ट्राशी जोडलं गेलेलं नाव, प्रदेश काँग्रेसचा प्रमुख चेहरा, दिलखुलास व्यक्तिमत्व असलेल्या विलासराव देशमुख यांनी आपली कारकीर्द गाजवली. त्यांचे दुसरे सुपुत्र असलेल्या अभिनेता रितेश देशमुखचा आज(ता.17) 46 वा वाढदिवस आहे.
अभिनेता रितेश देशमुखनं 2003 रोजी आलेल्या 'तुझे मेरी कसम' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून तो दमदार अभिनयानं हिंदीसह मराठी सिनेसृष्टी सिनेक्षेत्र चांगलंच गाजवत आला आहे.
रितेशचे शालेय शिक्षण लातूर येथेच झाले असून महाविद्यालयीन शिक्षण जि.डी.सोमाणी मेमोरिअल स्कूल येथे झाले आहे. कमला रहेजा महाविद्यालय, मुंबई या महाविद्यालयातून त्यांनी आर्किटेक्ट ही पदवी प्राप्त केली.
राजकीय एन्ट्रीसाठी एकीकडे 'रेड कार्पेट' तयार असतानाच आणि वडील विलासराव देशमुख दोनदा मुख्यमंत्री राहिले असतानाही रितेशनं नेताऐवजी अभिनेता होणं पसंद केलं.
तुझे मेरी कसम चित्रपटाद्वारे जोडी जमलेल्या जेनेलिया डिसुझासोबतच रितेशनं आपली लगीनगाठ बांधली.2012 मध्ये हिंदू व ख्रिश्चन या दोन्ही रितीरिवाजानुसार दोघेही विवाहबद्ध झाले.
प्रदीर्घ राजकीय वारसा लाभलेल्या रितेशच्या दोन्ही भावांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात आपलं बस्तान बसवलं. अमित देशमुख हे महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री तर धीरज देशमुख आमदार राहिले आहेत. दोघेही जण काँग्रेसमध्ये कार्यरत आहे.
रितेश आणि जेनेलिया यांना 2 मुलं असून त्यांची नावं रिआन व राहील आहेत.
लय भारी चित्रपटाद्वारे या रितेशनं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. तसेच रितेश अनेकदा मराठी पुरस्कार सोहळ्यांचे सूत्रसंचलनासह मराठी बिग बॉसचं शोही होस्ट केला होता. अनेक पुरस्कारांनी रितेशला आजपर्यंत गौरवण्यात आलं आहे.
आपल्या दमदार अभिनयानं बॉलिवूड गाजवत असलेल्या रितेशला एकेकाळी आपला सिनेमा फ्लॉप ठरला किंवा प्रेक्षकांना जर अभिनय आवडला नाही, तर ते मुख्यमंत्री वडिलांना नावं ठेवतील अशी भीती निर्माण झाली होती.
विलासरावांना ज्यावेळी चिरंजीव रितेशची ही बाब समजली,तेव्हा त्यांनी एक मोलाचा सल्ला दिला. ते रितेशला म्हणाले, 'माझ्या नावाची मी काळजी घेतो, तुझ्या नावाची तू काळजी घे...'.