Kanti Singh Birthday: भोजपुरी चित्रपटाच्या नायिका राहिल्या 'या' माजी केंद्रीय मंत्री...

सरकारनामा ब्यूरो

माजी खासदार

14व्या लोकसभेच्या माजी खासदार कांती सिंह यांचा जन्म 8 मार्च 1957 मध्ये झाला.

Kanti Singh | Sarkarnama

माजी केंद्रीय मंत्री

राष्ट्रीय जनता दल (RJD) नेत्या कांती सिंह या माजी केंद्रीय मंत्री आहेत.

Kanti Singh | Sarkarnama

RJD नेत्या

RJD च्या महिला सेलच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाबरोबर त्या राष्ट्रीय सरचिटणीसदेखील आहेत.

Kanti Singh | Sarkarnama

विक्रमगंज मतदारसंघ

11व्या आणि 13व्या लोकसभेवर विक्रमगंज मतदारसंघातून त्या निवडून आल्या होत्या.

Kanti Singh | Sarkarnama

आराह मतदारसंघाचेही प्रतिनिधित्व

बिहारच्या आराह मतदारसंघाचेही त्यांनी एकदा प्रतिनिधित्व केले आहे.

Kanti Singh | Sarkarnama

केंद्र सरकारमध्ये चोख जबाबदारी

केंद्र सरकारमध्ये विविध खात्यांची चोख जबाबदारी त्यांनी उत्तमरित्या पार पाडली.

Kanti Singh | Sarkarnama

महत्त्वाची पदे भूषवली

मानव संसाधन विकास, महिला बाल विकास, पर्यटन आणि सांस्कृतिकमंत्री यांसारखी अनेक महत्त्वाची पदे त्यांनी भूषवली आहेत.

Kanti Singh | Sarkarnama

चित्रपटाच्या ऑफर्स

राजकीय कारकीर्द गाजवत असताना माजी केंद्रीय मंत्री कांती सिंह यांना भोजपुरी चित्रपटात काम करण्याच्या अनेकदा ऑफर्सही आल्या होत्या.

Kanti Singh | Sarkarnama

भोजपुरी चित्रपटात केले काम

चित्रपटात काम करणे हे यांच्यासाठी नवीन नव्हते. कारण 1989 मध्ये 'हमार दुल्हा' या भोजपुरी चित्रपटात त्यांनी काम केले होते.

R

Kanti Singh | Sarkarnama

Next : महाविकास आघाडीतील युवा नेत्यांचा महाराष्ट्रभिमानाचा हुंकार...

येथे क्लिक करा