Rob Jetten : इतिहास घडणार, जगाला मिळणार पहिले ‘गे’ पंतप्रधान; साखरपुडा झालेला हा नेता कोण?

Rajanand More

गे पंतप्रधान

जगाच्या राजकीय पटलावर लवकरच ऐतिहासिक घडामोड घडणार आहे. पहिले गे पंतप्रधान म्हणून एक नेता लवकरच शपथ घेणार आहे.

Rob Jetten | Sarkarnama

रॉब जेटेन

रॉब जेटेन असं या नेत्याचं नाव आहे. ते नेदरलँडमधील D-66 या पक्षाचे नेते असून देशाच्या निवडणुकीत बाजी मारली आहे. जेटेन हे भावी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत.

Rob Jetten | Sarkarnama

हँडसम हंक

38 वर्षीय जेटेन हे नेदरलँडसह युरोपातील लोकप्रिय नेते असून त्यांचे चाहते त्यांना हँडसम हंक म्हणूनही ओळखतात.

Rob Jetten | Sarkarnama

जाहीर कबुली

जेटेन यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यास ते जगातील पहिले गे पंतप्रधान असण्याची शक्यता आहे. त्यांनी जाहीरपणे आपण समलैंगिक असल्याची कबुली काही वर्षांपूर्वीच दिली आहे.

Rob Jetten | Sarkarnama

राजकारणात प्रवेश

उच्चशिक्षित असलेल्या जेटेन यांनी डी-66 या पक्षात युवक शाखेतून प्रवेश केला. त्यानंतर एक-एक टप्पा पार करत 2017 मध्ये ते पहिल्यांदा खासदार झाले.

Rob Jetten | Sarkarnama

संसदेत नेते

जेटेन यांना लोकप्रियतेच्या जोरावर संसदेत पक्षाचे नेते म्हणून संधी देण्यात आली. तेव्हापासून ते पक्षाचा रणनीतीचा एक भाग बनले.

Rob Jetten | Sarkarnama

विश्वास ठेवा, शक्य आहे

निवडणुकीमध्ये जेटेन यांनी विश्वास ठेवा, शक्य आहे, ही घोषणा देत लोकांची भरघोस मते मिळवली आहे. त्यांच्या पक्षाला बहुमत मिळाले नसले तरी आघाडीचे सरकार अस्तित्वात येईल.  

Rob Jetten | Sarkarnama

साखरपुडा

जेटेन यांची लव्हस्टोरी लपून राहिलेली नाही. ऑलिम्पियन निको कीनन यांच्यासोबत 26 नोव्हेंबर 2024 रोजी या जोडप्याने सोशल मीडियातून साखरपुड्याची घोषणा केली होती. 

Rob Jetten | Sarkarnama

NEXT : मतदान केंद्रावर न जाता मतदान शक्य! पोस्टल बॅलेटचा अधिकार कुणाला?

येथे क्लिक करा.