Postal Ballot : मतदान केंद्रावर न जाता मतदान शक्य! पोस्टल बॅलेटचा अधिकार कुणाला?

Rashmi Mane

लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव

भारतामध्ये मतदानाचा दिवस म्हणजे लोकशाहीचा सण! हजारो-लाखो नागरिक मतदान करून लोकप्रतिनिधी ठरवतात. पण... मतदानाच्या दिवशी आपण दुसऱ्या शहरात असाल तर? तुमचं मतदान चुकणार का?

मतदान केंद्रावर नसाल तर काय?

सध्या भारतात, तुम्ही तुमच्या मतदारसंघात नसाल तर प्रत्यक्ष मतदान करता येत नाही.
पण काही नागरिकांना पोस्टानं मतदान (Postal Ballot) करण्याची मुभा मिळते.
त्यालाच Absentee Ballot म्हणतात.

पोस्टानं मतदान कोण देऊ शकतं?

सरकारी कर्मचारी, नोंदणीकृत पत्रकार, आणि निवडणुकीच्या दिवशी ड्युटीवर असणारे अधिकारी. जसे की पोलिस, रेल्वे, वीज, आरोग्य, टपाल, दूरदर्शन, BSNL, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन इ. त्यांना ही सुविधा उपलब्ध असते.

अर्ज कसा करावा?

तुम्ही या निकषांमध्ये बसत असाल तर रिटर्निंग ऑफिसरकडे अर्ज (Postal Ballot Form) सादर करा. तो अर्ज तुम्हाला कार्यालयातून किंवा निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरून मिळू शकतो.

पोस्टानं मत देण्याची प्रक्रिया

रिटर्निंग ऑफिसर तुमच्याकडे मतपत्रिका पाठवतो. त्यामध्ये उमेदवार निवडा मतपत्रिका ‘सिक्रसी स्लिव्ह’मध्ये ठेवा. फॉर्म भरा आणि लिफाफ्यात बंद करा. दिलेल्या पत्त्यावर पोस्टानं पाठवा. मतमोजणीपूर्वी ही मतं मोजणी केंद्रावर जमा होतात.

घरून मतदानाची सुविधा कोणाला?

शारीरिक अडचण असलेल्या नागरिकांसाठीही सोय आहे! 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक
40% पेक्षा जास्त अपंगत्व असलेले व्यक्ती यांना घरून मतदानाची मुभा आहे.

घरून मतदानाची प्रक्रिया

या मतदारांनी फॉर्म 12D भरून रिटर्निंग ऑफिसरकडे द्यायचा, मतदानाच्या दिवसापूर्वी अधिकारी त्यांच्या घरी येतात. मतपत्रिका देतात आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगसह मतदान घेतात.

गुप्तता आणि पारदर्शकता

घरून मतदान गुप्ततेत घेतलं जातं. राजकीय पक्षांना आधी माहिती दिली जाते. मतदान प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी व्हिडिओ रेकॉर्डिंगची अट बंधनकारक आहे.

Voter | Sarkarnama

Next : फलटणच्या तपासात धडाकेबाज IPS अधिकाऱ्याची एन्ट्री; CM फडणवीसांना आठवल्या साताऱ्याच्या माजी अधिक्षक

येथे क्लिक करा