Roshan More
आरजेडीच्या पराभवानंतर तेजस्वी यादव यांची मोठी बहीण रोहिणी आचार्य यांनी संजय यादव यांच्यावर टीका करत घर आणि कुटुंबाशी नाते संपवत असल्याचे जाहीर केले आहे.
रोहिणी यांनी आपण राजकारण सोडत असल्याचे जाहीर केले आणि यासाठी संजय यादव यांना जबाबदार धरले.
संजय यादव यांचा उल्लेख आरजेडीचे चाणक्य म्हणून केला जातोय.
संजय यादव हे आरजेडीचे राज्यसभा खासदार आहेत.
संजय यादव हे तेजस्वी यादव यांचे मित्र आहेत. त्यांची आणि तेजस्वीची भेट ही दिल्लीत झाली होती.
संजय हे तेजस्वी यांच्यासाठी आपला आयटीतील जाॅब सोडून बिहारमध्ये गेले. तेथे पक्षासाठी काम केले.
मूळ हरियाणाचे
संजय यादव हे मुळ हरियाणातील आहेत. दिल्लीमध्ये शिक्षण घेत असताना त्यांची तेजस्वी यांच्यासोबत ओळख झाली.