Deepak Kulkarni
बिहार राज्यांमध्ये रोहिणी आचार्य यांची 'किडनी देनेवाली बेटी' म्हणून विशेष ओळख आहे.
डॉक्टरांनी बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजदचे प्रमुख नेते लालू प्रसाद यादव यांना डिसेंबर 2022 मध्ये किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला होता.
तेव्हा रोहिणी आचार्य यांनी लालू प्रसाद यादवांना प्रत्यारोपणासाठी एक किडनी दिली होती.
लालू प्रसाद यादव यांच्या त्या कन्या आहेत.
त्या यंदाच्या लोकसभेला बिहारमधील सारण मतदारसंघाच्या राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवार आहेत.
येत्या 20 मे रोजी पाचव्या टप्प्यामध्ये या मतदारसंघाचे मतदान पार पडणार आहे.
लालू प्रसाद यादव यांनी चारवेळा याच मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. पण रोहिणी या पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.
सारणमधील 18 लाख मतदारांपैकी अंदाजे 3.5 लाख मतदार यादव, तर 3.25 लाख मतदार राजपूत आहेत.
भाजपाचे विद्यमान खासदार राजीव प्रताप रुडी यांचे रोहिणी यांच्यासमोर तगडं आव्हान आहे. ते या मतदारसंघातून चारवेळा खासदार राहिले आहेत.