Ganesh Sonawane
राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे दुसरे पती डॉ. प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील कथित रेव्ह पार्टी प्रकरणात अटक झाली आहे.
पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर रोहिणी खडसे यांनी प्रांजल खेवलकर यांच्यासोबत लग्न केलं.
तू जोडीदार शोधून आणू शकते पण फायनल आम्ही करु असं वडील एकनाथ खडसे यांनी रोहिणी यांना सांगितलं होतं.
त्यानुसार रोहिणी खडसे यांनी त्यांचा बालपणीचा मित्र प्रांजल सोबत आपल्याला लग्न करायचं असल्याची इच्छा वडिलांना सांगितली.
एकनाथ खडसे यांनी रोहिणी यांना प्रांजल खेवलकर यांच्यासोबत लग्न करण्यासाठी परवानगी दिली.
खेवलकर व खडसे परिवारामध्ये अनेक वर्षांपासून घरगुती व जवळचे संबंध राहिले आहेत. दोन्ही परिवार मुळचे मुक्ताईनगरचे आहेत.
एकमेकांना दोन्ही परिवार जवळून ओळखत होता. त्यामुळे मुलगा-मुलगी बघण्याचा कार्यक्रम वैगेरे काही झाला नाही असं रोहिणी खडसे सांगतात.
रोहिणी यांनी प्रांजल यांना बघितलेलं होतं. दोघे चांगले मित्रही होते. त्यामुळे कुटुंबाची परवानगी घेऊन दोघांनी लग्न केलं.
दोघांचाही हा दुसरा विवाह आहे. रोहिणी -प्रांजल यांना दोन जुळी मुलं आहेत. सारा आणि समरजित अशी दोघांची नावे आहेत.
पत्नी रोहिणी खडसे राजकारणात सक्रिय आहे, पण पती प्रांजल हे राजकारणापासून लांब आहेत. प्राजंल खेवलकरांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे.