सरकारनामा ब्यूरो
रोहित पवारांनी उत्साह दाखवत भीमथडी जत्रेत सहभाग घेतला.
जत्रेचे आकर्षण असलेल्या नंदीबैलाला त्यांनी प्रश्न विचारले.
"राज्यातल्या हिवाळी अधिवेशनात सामान्य जनतेला काय मिळाले?" असा प्रश्न विचारताच नंदीबैलाने मान हलवली आणि नाही असे उत्तर आले.
यावेळीचे फोटो आणि व्हिडिओ त्यांनी ट्विटरवर शेअर केले आहे.
जत्रेचा आनंद घेत त्यांनी तेथील स्टॉल्सवर जाऊन लोकांशी संवाद साधला आणि माहिती घेतली.
भीमथडी जत्रेत संपूर्ण पवार कुटुंब उत्साहाने सहभाग घेत असते.
पुण्यातील कृषी विद्यापीठाच्या मैदानावर भीमथडी जत्रा सुरू झाली आहे.
जत्रेत ग्रामीण आणि शहरी संस्कृतीचे दर्शन तसेच विविध पारंपरिक खेळ, खवय्यांसाठी वेगवेगळ्या पदार्थ्यांची रेलचेल बघायला मिळते.