Deepak Kulkarni
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांना बारामती अॅग्रो कंपनी प्रकरणात ईडीने बुधवारी (ता. 24 जानेवारी) हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोवर दोन आठवड्यांपूर्वी ईडीनं मोठी कारवाई केली.
आता त्यापाठोपाठ रोहित पवारांना ईडीनं समन्स बजावल्यानंतर ते स्वत: ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले आहेत.
रोहित पवारांनी ईडी कार्यालयात पोहचण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले.
रोहित पवार बुधवारी सकाळी चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात जात असताना सुप्रिया सुळेंनी त्यांना राज्यघटना भेट म्हणून दिली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीही केली.
रोहित पवार ईडीच्या कार्यालयात दाखल होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तिथे जमून शक्तिप्रदर्शन केल्याचं बोललं जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची ईडी चौकशी संपली आहे.
तब्बल बारा तास चाललेल्या ईडी चौकशीनंतर रोहित पवार हे ईडीच्या कार्यालयातून बाहेर आले आहेत.