Jagdish Patil
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्माने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
7 मे रोजी इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं होतं.
कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या अधिकृत निवासस्थांनी जाऊन रोहितने फडणवीस यांची भेट घेतली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोहितचं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याबद्दल अभिनंदन केलं.
तसंच 2011 ते 2025 या 14 वर्षांच्या गौरवशाली कारकिर्दीबद्दल CM फडणवीसांनी त्याचं कौतुक देखील केलं.
रोहितबरोबर झालेल्या भेटीचे फोटो पोस्ट करताना फडणवीस यांनी लिहिलं की, माझ्या निवासस्थानी येऊन भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माने भेट घेतली.
त्याच्याशी संवाद साधणं हा खूप चांगला अनुभव होता. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याबद्दल आणि त्याच्या प्रवासाच्या पुढील टप्प्यात यश मिळावे यासाठी मी त्याला शुभेच्छा दिल्या!