सरकारनामा ब्यूरो
मुकेश अंबानी, गौतम अदानी हे भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्तीच्या लिस्टमध्ये येतात. पण आता यांना टक्कर देणारी एक 27 वर्षीय तरुणीची खूप चर्चा होत आहे. कोण आहे ही तरुणी जाणून घेऊयात.
रोशनी नादर असं या 27 वर्षीय तरुणीचे नाव असून त्या एचसीएलचे संस्थापक शिव नादर यांच्या कन्या आहेत.
रोशनी यांच आता कंपनी सांभाळत असून अनेक देशात 52 व्यवसाय सुरु आहेत. त्या 10,44,81,56,24,400 इतक्या संपत्तीच्या मालकीण आहेत.
रोशनी यांचे शिक्षण दिल्लीतील वसंत व्हॅली स्कूलमध्ये झाले. यानंतर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेल्या. नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीतून मास कम्युनिकेशन्समध्ये पदवी प्राप्त केली. केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून त्यांनी एमबीएची पदवी मिळवली.
मास कम्युनिकेशनमध्ये रेडिओ, चित्रपटचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी निर्माता म्हणूनही काम केले आहे. तसेच अनेक प्रसिद्ध न्यूज चॅनेलमध्ये त्यांनी न्यूज अँकर म्हणून काम केले.
1976 ला शिव नादर यांनी एचसीएल टेक्नॉलॉजी (HCL) कंपनीची स्थापना केली. वडिलांनी आपल्या मुलीवर कंपनीची जबाबदारी सोपवली असून रोशनी या कंपनीच्या सीईओ बनल्या आहेत.
2019 फोर्ब्सच्या 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत रोशनी या 54 व्या क्रमांकावर होत्या.
पती हेल्थकेअरचे उपाध्यक्ष
रोशनी यांनी शिखर मल्होत्रा यांच्याशी विवाह केला आहे. शिखर सध्या एचसीएल हेल्थकेअरचे उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत.