सरकारनामा ब्यूरो
प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात अनेक नावाची प्रचंड चर्चा होत होती. अशातचं एक नाव चर्चेत आलं ते म्हणजे साध्वी भगवती सरस्वती यांचे.
साध्वी भगवती सरस्वती यांचे परमार्थ निकेतन आश्रमाशी नाते आहे. त्यामुळे त्या महाकुंभातही सहभागी झाल्या होत्या.
सनातन धर्माला मानणाऱ्या लोकांसाठी त्या एक आहेत. भारतीय जीवनशैली ही शांती आणि साधेपणाचे प्रतीक आहे, असा संदेश त्या जगाला देतात.
भगवती यांचा जन्म अमेरिकेतील एका ज्यू कुटुंबात झाला असून स्टॅनफोर्ड विद्यापीठातून त्यांनी ग्रॅज्युएशन केले आहे.
1996ला सरस्वती भारतात आल्या आणि त्या कायमच्या येथेच स्थायिक झाल्या.
'हॉलीवुड-टू-द- हिमालय' हे त्यांचे पुस्तक आहे. त्यांना बालपणी लैंगिक शोषणाचा कसा सामना करावा लागला, त्या यातून बाहेर कशा आल्या हे त्यात त्यांनी सांगितले आहे.
त्यांचे लग्न झाले असून त्यांना एक मुलगी आहे. काही वर्षानंतर त्या पतीपासून विभक्त आहेत. शांती अध्यात्म आणि सत्याचा मार्ग शोधात त्या भारतात आल्या.
त्यांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला असून स्वामी चिदानंद सरस्वती यांच्याकडून त्यांनी दिक्षा घेतली आहे. सध्या त्या परमार्थ निकेतन आश्रमाच्या सदस्य आहेत.