Royal Family Candidates : लोकशाहीच्या मैदानात 'राजे-महाराजे'; राजघराण्यातील उमेदवार झाले उदंड...

Chetan Zadpe

शाहू महाराज -

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून छत्रपती घराण्याचे वंशज शाहू महाराज यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.

उदयनराजे भोसले -

छत्रपती राजघराण्याचे वंशज उदयनराजे भोसले यांना भाजपने साताऱ्यातून उमेदवारी दिली आहे.

संगीता कुमारी सिंग देव -

भाजपानं ओडीसाच्या पटनाग-बोलांगीर या मतदारंघातून संगीता कुमारी सिंग देव यांना लोकसभेचं तिकीट दिलं आहे. संगीता कुमारी सिंग देव यांचा विवाह पटनाग-बोलांगीर राजघराण्याचे कनकवर्धन सिंग देव यांच्याशी झाला होता. 

मालविका केशरी देव

भाजपाने ओडीसातील कालाहंडी संस्थानातील मालविका केशरी देव यांना लोकसभेचं तिकीट दिलं आहे.

ज्योतिरादित्य शिंदे -

मध्य प्रदेशमधील गुना लोकसभा मतदारसंघातून भाजपानं शिंदे राजघराण्यातील सदस्य जोतिरादित्य शिंदे यांना उमेदवारी दिली आहे.

प्रणीत कौर -

पंजाबमधील पटियाला लोकसभा मतदारसंघातून भाजपानं माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या प्रणीत कौर यांना उमेदवारी दिली आहे. अमरिंदर सिंग हे पटियालाच्या राजघराण्याचे सदस्य आहेत.

यदुवीर कृष्णदत्त चामराजा वाडियार -

म्हैसूर लोकसभा मतदारसंघातून भाजपानं ३२ वर्षीय यदुवीर कृष्णदत्त चामराजा वाडियार यांना लोकसभेचं तिकीट दिलं आहे. ते म्हैसूरच्या राजघराण्याचे सदस्य असून, पहिल्यांदाच निवडणूक लढवीत आहेत.

माला राज्यलक्ष्मी शाह -

उत्तराखंडमधील टिहरी गढवालमधून भाजपानं विद्यमान खासदार माला राज्यलक्ष्मी शाह यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. त्या टिहरी गढवालचे महाराजा मनुजेंद्र शाह साहिब यांच्या पत्नी आहेत.

कृती सिंह देबबर्मा -

भाजपानं पूर्व त्रिपुरामधून महाराणी कृती सिंह देबबर्मा यांना उमेदवारी दिली आहे. त्या त्रिपुरातील माणिक्य राजघराण्याच्या सदस्या आहेत. त्यांचे पती योगेश्वर राज सिंह हे काँग्रेसचे माजी नेते आहेत.

NEXT : अमित शाह मताधिक्याचा विक्रम मोडणार का? गांधीनगरमधून भरला उमेदवारी अर्ज