Jagdish Patil
मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा 2 दिवसीय शताब्दी समारोह आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला सलमान खान, रणबीर कपूर विकी कौशल, शिल्पा शेट्टी, अक्षय कुमार अशा दिग्गज सेलिब्रिटींनी हजेरी लावली.
तर पाकिस्तान सोडून भारताचं नागरिकत्व स्वीकारलेला गायक अदनान सामीही या कार्यक्रमात उपस्थित होता.
सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबतचे फोटो सामीने सोशल मीडियावर शेअर केलेत.
ज्यामध्ये, 'सरसंघचालकांसोबत उत्तम वेळ घालवला त्यांच्या भाषणामुळे माझे बरेच गैरसमजसुद्धा दूर झाल्याचं त्याने लिहिलंय.
याच फोटोंवरून खासदार संजय राऊतांनी संघांचे चारित्र्य बिघडल्याचं म्हटलं आहे.
भागवतांच्या शेजारी बसलेल्या सामीच्या वडिलांनी भारतावर बॉम्बिंग केलं होतं, तुम्ही कोणती प्रेरणा देताय? असं राऊत म्हणाले.
तर ज्या सामीमुळे वादाला तोंड फुटलंय तो बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक असून त्याचा जन्म लाहोरमध्ये झाला आहे.
अदनानचे वडील अर्शद सामी हे पाकिस्तानी राजकारणी होते. तो सर्वोत्तम पियानो वादक आहे.
अदनानने 4 लग्न केली आहेत त्यापैकी तीन लग्ने 5 वर्षेही टिकली नाहीत. तपाकिस्तान सोडलेल्या अदनानला 2016 मध्ये भारतीय नागरिकत्व मिळाले.
अदनानला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, यावरून बराच वाद झाला होता.