सरकारनामा ब्यूरो
हिंदी गाणी आणि हिंदी चित्रपट जगभरात भारताचे एकप्रकारे राजदूत म्हणूनच ओळखले जातात. त्यांची लोकप्रियता इतकी आहे की अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधानही त्यांचे चाहते आहेत. वेगवेगळ्या प्रसंगी हे नेते हिंदी गाणी गुणगुणताना दिसले आहेत.
मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम हे देखील हिंदी गाण्यांचे चाहते आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या मलेशियाच्या दौऱ्यावर आहेत, यादरम्यान त्यांनी भारतीय समुदायाशी संवाद साधताना याचा उल्लेख केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “अनवर इब्राहिम खूप छान हिंदी गाणी गातात… हे अनेक भारतीयांना माहिती नाही.” या दौऱ्यादरम्यान मोदींनी हा खुलासा केला आहे.
ऑगस्ट 2024 मध्ये अनवर इब्राहिम भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी किशोर कुमार यांचे एक हिंदी गाणे गुणगुणले होते, जे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
2018 च्या भारत दौऱ्यामध्ये कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टूड्रो यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमात आशिकी-2 मधील 'तुम ही हो' हे गाणे स्टेजवर गायले होते. भारतीयांना ते खुप आवडले होते. त्यावेळी ते सोशल मिडीयावर प्रचंड वायरल झाले होते.
भारत-जपान सांस्कृतिक कार्यक्रमात शिंजो आबे यांनी हिंदी गाण्याच्या ओळी गुणगुणल्या होत्या. ते नेहमी ‘नमस्ते’ म्हणत भारतीय संस्कृतीशी आपुलकी दाखवत असत.
बराक ओबामा 2015 मध्ये भारत दौऱ्यावर असताना त्यांनी ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ गायले होते तसेच चित्रपटातील “सेनोरिटा, बड़े-बड़े देशों में…” हा डायलॉग देखील म्हटला होता.
डेविड कॅमेरॉन ब्रिटनचे माजी पंतप्रधान 2015 च्या निवडणुकीत भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी कंझर्व्हेटिव्ह पार्टीने ‘नीला है आसमां…’ हे हिंदी गाणे लॉन्च केले होते. ब्रिटनच्या राजकारणात हा एक अनोखा प्रयोग होता.
या उदाहरणांवरून स्पष्ट होते की हिंदी गाणी आणि चित्रपट फक्त मनोरंजन नाही, तर
भारताची संस्कृती जगभर पोहोचवणारे प्रभावी माध्यम आहेत.