Dattatreya Hosabale : RSS च्या सरकार्यवाहपदी पुन्हा दत्तात्रय होसबळे

Rashmi Mane

दत्तात्रय होसबळे

दत्तात्रय होसबळे यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) सरकार्यवाहपदी पुढील तीन वर्षांसाठी फेरनिवड झाली आहे.

Dattatreya Hosabale | Sarkarnama

दुसरे सर्वोच्च पद

राष्ट्रीय स्वयं संघामध्ये सरसंघचालक या प्रमुख पदानंतर दुसरे सर्वोच्च पद म्हणजे सरकार्यवाह. RSS मध्ये सरचिटणीसांना सरकार्यवाह असे म्हणतात.

Dattatreya Hosabale | Sarkarnama

सरकार्यवाह पद

दत्तात्रेय होसबळे यांच्याकडे 2021 पासून सरकार्यवाह या पदाची जबाबदारी आहे.

Dattatreya Hosabale | Sarkarnama

13 व्या वर्षी संघात प्रवेश

दत्तात्रेय होसबळे यांचे कुटुंब 'आरएसएस'शी जोडलेले होते. वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी ते संघाचे स्वयंसेवक झाले.

Dattatreya Hosabale | Sarkarnama

संघाचे प्रचारक

होसबळे यांनी बंगळुरू विद्यापीठातून इंग्रजी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. 1978 मध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतर ते संघाचे प्रचारक बनले.

Dattatreya Hosabale | Sarkarnama

अभाविपचे सदस्य

दत्तात्रेय होसबळे हे देशातील आणीबाणीच्या काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (एबीव्हीपी) सदस्य होते. विद्यार्थी परिषदेत त्यांनी अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या. 1992 ते 2003 पर्यंत म्हणजे 11 वर्षे ते अभाविपचे संघटन मंत्री होते.

Dattatreya Hosabale | Sarkarnama

सह-सरकार्यवाह पदाची जबाबदारी

संघात केलेल्या कामामुळे त्यांना 2009 ते 2021 या काळात RSSचे सह-सरकार्यवाह पदाची जबाबदारी देण्यात आली.

Dattatreya Hosabale | Sarkarnama

विविध भाषांचे ज्ञान

होसबळे यांची मातृभाषा कन्नड आहे, परंतु त्यांना इंग्रजी, हिंदी, तमिळ, मराठी आणि संस्कृतचेही ज्ञान आहे. असिमा या कन्नड मासिकाचे ते संस्थापक संपादक आहेत.

R

Dattatreya Hosabale | Sarkarnama

Next : सोलापूरसाठी भाजप युवा चेहरा देणार, राम सातपुतेंचे नाव चर्चेत

Ram Satpute | Sarkarnama
येथे क्लिक करा