Jagdish Patil
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पारंपरिक विजयादशमी उत्सव आज नागपूरातील रेशीमबाग मैदानावर पार पडला.
'जय जय गूंजे भारत माँ की, उसी के हित में हम जिए मरे' म्हणजेच देश हित सर्वात महत्त्वाचे आहे, असा संदेश मंचावर लिहिला होता.
या कार्यक्रमासाठी सरसंघचालक डॉ.मोहन भागवत आणि मुख्य अतिथी म्हणून संजय गुप्ता यांची उपस्थिती होती.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विजयादशमी उत्सवात स्वयंसेवकांच्या गणवेशात उपस्थित होते.
या सोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील पूर्ण गणवेशात विजयादशमी उत्सवात सहभागी झाले.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खानही या कार्यक्रमात उपस्थित होते.
तर संघाने यंदाच्या विजयादशमी उत्सवात माजी उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनाही निमंत्रित केले होते.
दरम्यान, या कार्यक्रमात मोहन भागवत यांनी देशातील विविध महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केलं.
"लोकशाहीत आंदोलने होणे स्वाभाविक आहे. मात्र, आंदोलनांचा उद्देश समस्यांचे निराकरण असावा, समाजात फूट पाडणे नव्हे," असं ते यावेळी म्हणाले.