Rashmi Mane
देशात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवशीच काही नियमांमध्ये अनेक बदल झाले आहे. या बदलांमुळे सर्वसामान्य माणसाच्या खिशाला कात्री लागणार आहे हे नक्की. जाणून घेऊया ऑगस्ट महिन्यात झालेल्या 6 मोठ्या बदलांबद्दल...
देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकांपैकी एक असलेल्या HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये 1 ऑगस्ट पासून बदल करण्यात आला आहे. HDFC बँकेने आपल्या क्रेडिट कार्ड ग्राहकांसाठी नवीन अटी आणि शुल्काशी संबंधित काही महत्त्वाचे बदल केले आहेत.
2023-24 या आर्थिक वर्षासाठी तुमचा ITR सबमिट करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 होती. आणि जर तुम्ही तुमचा आयकर रिटर्न अंतिम मुदतीपूर्वी भरला नाही, तर 1 ऑगस्ट 2024 पासून तुम्हाला रिटर्न भरण्यासाठी दंड भरावा लागेल. हा दंड तुमच्या उत्पन्नानुसार बदलू शकतो. 5 लाख रुपयांपर्यंतच्या आयकरासाठी कमाल दंड 1000 रुपये आहे, तर 5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नासाठी 5000 रुपये दंड असणार आहे.
FASTag शी संबंधित नवीन नियमही कालपासून लागू झाले आहेत. नवीन नियमांनुसार, आता गाडी घेतल्यानंतर 90 दिवसांच्या आत फास्टॅग नंबरवर वाहन नोंदणी क्रमांक अपलोड करावा लागणार आहे. या अतिरिक्त वेळेतही वाहन क्रमांक अपडेट न केल्यास फास्टॅग ब्लाक लिस्ट केले जाईल. याशिवाय फास्टॅग कंपन्यांना 31 ऑक्टोबरपर्यंत 3 आणि 5 वर्षे जुन्या सर्व फास्टॅगचे केवायसी करावे लागणार आहे.
कालपासून तेल विपणन कंपन्यांनीही एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. आता वापरकर्त्यांना एलपीजी सिलेंडर पूर्वीपेक्षा मिळणार आहे. 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 8 रुपये 50 पैशांनी वाढ करण्यात आली आहे.
भारतात 1 ऑगस्ट 2024 पासून Google Map चे नियमही बदलण्यात आले आहेत. कंपनीने सेवा शुल्कात 70 टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. याशिवाय आता बिलिंगही डॉलरऐवजी रुपयात होणार आहे. तथापि, या बदलामुळे सामान्य वापरकर्त्यांवर कोणताही अतिरिक्त बोजा पडणार नाही.
ऑगस्ट 2024 मध्ये 31 पैकी 13 दिवस बँका बंद राहणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये सणाच्या सुट्यांव्यतिरिक्त राष्ट्रीय सुट्ट्या, रविवार आणि दुसऱ्या शनिवारच्या सुट्ट्यांचा समावेश आहे.