Pradeep Pendhare
सार्वजनिक गणेश मंडळांना उत्सवासाठी सरकारकडून अनुदान मिळते.
सरकारी अनुदान पाहिजे असल्यास, यासाठी विविध उपक्रमांची गणेश मंडळांना अट असते.
सार्वजनिक गणेश मंडळ रजिस्टर असणे आवश्यक असून, प्रत्येक वर्षी कामाचा अहवाल असावा.
गणेशोत्सवातून पर्यावरणपूरक संदेश, सामाजिक जनजागृती, महिला सुरक्षणासारख्या विषयांवर भाष्य करणे गरजेचे.
सरकारकडून मंडळांना 5 ते 25 हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते.
महापालिका/जिल्हा परिषदा दरवर्षी प्रतिस्पर्धात्मक निकषांवर हे अनुदान देतात.
मंडळ नोंदणीकृत असण्याबरोबर उत्सवासाठी नोंदणी क्रमांक असणे गरजेचे आहे.
मंडळाकडे नोंदणी प्रमाणपत्र, पॅन कार्ड, उत्सवाचे व सामाजिक उपक्रमांचे अहवाल अन् कागदपत्र गरजेची.
जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ऑनलाईन किंवा ऑफलाइन अर्ज स्वीकारले जातात.