Rupal Rana : दोनदा अपयश, परीक्षेआधी आईचे निधन..., तरीही धीर न सोडता पोरीची गरुडझेप! 'या' गुणी IAS ची सक्सेस स्टोरी वाचाच...

Jagdish Patil

सक्सेस स्टोरी

जिद्द, कष्ट करण्याची तयारी आणि योग्य मार्गदर्शन असेल तर यश मिळवणं अवघड नसतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे रूपल राणा यांची सक्सेस स्टोरी आहे.

IAS Rupal Rana | Sarkarnama

रुपल राणा

UPSC परीक्षेत 26 वी रँक मिळवणाऱ्या रुपल राणा यांना कमी वयातच अनेक समस्यांचा सामाना करावा लागला.

IAS Rupal Rana | Sarkarnama

शिक्षण

मूळच्या यूपीतील बागपतच्या असणाऱ्या रूपल यांनी बरौत येथून प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. तर पिलानीच्या बिर्ला इन्स्टिट्यूटमधून 11वी, 12वीचं शिक्षण घेतलं.

IAS Rupal Rana | Sarkarnama

बी.एस्सी

शालेय शिक्षणानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या देशबंधू कॉलेजमधून बी.एस्सी. पूर्ण केली.

IAS Rupal Rana | Sarkarnama

वडील

त्यांचे वडील जसवीर राणा हे दिल्ली पोलिसात ASI म्हणून कार्यरत आहेत.

IAS Rupal Rana | Sarkarnama

आईची इच्छा

रुपल यांना UPSC त दोनदा अपयशाचा सामना करावा लागला. मात्र, आई अंजू यांची इच्छा होती की त्यांनी यश मिळवून कुटुंबाचं नावं मोठं करावं.

IAS Rupal Rana | Sarkarnama

आईचं निधन

मात्र, परीक्षेची तयारी करत असतानाच आईचं निधन झालं. तरीही त्यांनी धीर न सोडता अभ्यास सुरूच ठेवला.

IAS Rupal Rana | Sarkarnama

UPSC केली क्रॅक

आईच्या प्रेरणेमुळेच 2023 तिसऱ्यांदा परीक्षेची तयारी केली आणि यावेळी त्यांनी 26 व्या रँकने UPSC क्रॅक केली.

IAS Rupal Rana | Sarkarnama

NEXT : संपूर्ण राज्याची जबाबदारी खांद्यावर; पतीशी तुलना होताच भडकल्या...

Sarada Muraleedharan | Sarkarnama
क्लिक करा