Ganesh Sonawane
रशियाचे राष्ट्रध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे दोन दिवस भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्याबद्दल वेगळीच चर्चा रंगली आहे.
व्लादिमीर पुतिन यांच्या तंदुरुस्त शरीरयष्टीमागे 'ब्लड बाथ सीक्रेट' आहे असे बोलले जाते...
स्थानिक रशियन माध्यमांच्या वृत्तांनुसार त्यांच्या फिटनेसचं व स्टॅमिनाचं रहस्य हे हरणांच्या शिंगांच्या रक्ताशी संबंधित आहे.
सीएनएनच्या वृत्तानुसार, रशियातील स्थानिक माध्यमांच्या रिपोर्टमध्ये असं म्हटलं गेलं आहे की, पुतिन हे अशा अनेक रशियन लोकांपैकी एक आहेत ज्यांनी सायबेरियन लाल हरणांची कापलेली शिंगं खाल्ली आहेत.
बिझनेस इनसायडरच्या रिपोर्टनुसार, पुतिन यांनी हरणांच्या शिंगांमधून काढलेल्या रक्ताने आंघोळ केली आहे, असाही दावा रशियन तपास वृत्तसंस्था प्रोएक्टने केला आहे.
हरीणच्या रक्तामुळे ताकद मिळते आणि वय वाढण्याची प्रक्रिया थांबते असा समज आहे. पण तसा वैधानिक पुरावा नाही.
हरणांचे रक्त हे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणाली सुधारते आणि त्वचेला पुनरुज्जीवित करते, म्हणजेच ती त्वचा तरूण होते, असेही मानले जाते.
रिपोर्ट्सनुसार, वसंत ऋतूमध्ये या हरिणांची शिंगं कापली जातात, त्यानंतर त्यातून जे रक्त निघतं ते गरम पाण्यात उकळलं जातं. त्यातून गुलाबी रंगाचं द्रव्य निघतं. उकळल्यानंतर, जे मिश्रण तयार होतं, त्या मिश्रणाने 10 ते 20 मिनिटे आंघोळ केली जाते.