Jagdish Patil
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आजपासून दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत.
या दौऱ्यात रशिया आणि भारतामध्ये मोठे व्यावसायिक करार होण्याची शक्यता आहे.
तर याच दौऱ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा पुतीन यांच्या संपत्तीचीही चर्चा सुरू झाली आहे.
पुतीन यांचे वार्षिक उत्पन्न सुमारे 1.26 कोटी इतकं आहे. त्यांनी जाहीर केलेल्या मालमत्तेत एक अपार्टमेंट आणि 3 कारचा समावेश आहे.
मात्र, तज्ज्ञांचा म्हणण्यानुसार पुतीन यांनी दाखवलेली संपत्ती खरी नसून त्यांच्याकडे खूप संपत्ती आहे.
रशियाचे गुंतवणूकदार बिल ब्राउडर यांच्या म्हणण्यांनुसार, 2003 मध्ये रशियन अब्जाधीश मिखाईल खोडोरकोव्स्की यांना तुरुंगवास झाल्यापासून पुतीन यांच्या संपत्तीत वाढ होऊ लागली.
त्यांच्या कथित मालमत्तांमध्ये 1.4 अब्ज डॉलर किमतीचा 1 लाख 90 हजार चौरस फुटांचा एक विशाल महाल आणि 19 इतर घरांचा समावेश आहे.
या महालाच्या बाथरूममध्ये 76 हजारांचे इटालियन टॉयलेट ब्रश आणि जवळपास 1.13 लाखांचा टॉयलेट पेपर होल्डर वापरला जातो असं बोललं जातं.
पुतीन यांच्याकडे 8 विमाने आहे. यातील 716 मिलियन डॉलर किमतीच्या 'द फ्लाइंग क्रेमलिन' विमानात 75 हजार डॉलर्सचे सोन्याचे टॉयलेट असल्याची चर्चा आहे.
यासह त्यांच्याकडे जिम आणि मसाज पार्लरसह 22 डब्यांची बुलेटप्रूफ 'घोस्ट ट्रेन' आहे, ज्यासाठी 74 मिलियन डॉलर त्यांनी खर्च केलेत.