जामीन मंजूर झालेल्या सचिन वाझेनं तुरुंगात लिहिलं पुस्तक, ज्याची राजकीय वर्तुळात सुरुय जोरदार चर्चा, काय आहे नाव..?

Deepak Kulkarni

अँटिलिया बॉम्बस्फोट

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारच्या काळातील अँटिलिया बाहेरील बॉम्बस्फोट प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणं प्रचंड गाजली आणि तितकीच वादग्रस्तही राहिली होती.

Sachin waze Book | Sarkarnama

वाझेला अटक

याचप्रकरणी एनआयएनं तत्कालीन पोलिस अधिकारी सचिन वाझेला अटक केली होती. यानंतर वाझेला पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं होतं.

Sachin waze | Sarkarnama

जामीन मंजूर

या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने तपास केला असून, विशेष NIA न्यायालयात खटला सुरू आहे. आता एनआयए कोर्टानं वाझेला जामीन मंजूर केला आहे.

Sachin waze | Sarkarnama

तुरुंगात लिहिलं पुस्तक

सचिन वाझे आता साडेपाच वर्षांनंतर तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता आहे. त्यांनी तुरुंगात असताना पुस्तक लिहिले आहे.

Sachin waze | Sarkarnama

राजीव गांधींवर पुस्तक...

सचिन वाझे यांचं हे पुस्तक भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येच्या घटनेवर आधारित आहे.

Sachin waze | Sarkarnama

नुकतेच प्रकाशित

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे तिसरे पुस्तक 'Lesser Man Bigger Target – सामान्य माणूस मोठे लक्ष्य' हे नुकतेच प्रकाशित झाले आहे.

Sachin waze | Sarkarnama

यापूर्वी दोन पुस्तके...

यापूर्वी त्यांनी 26/11 च्या मुंबई हल्ल्यावर ('जिंकून हरलेली लढाई') तसेच BNSS (भारतीय नागरिक सुरक्षा संहिता) आणि UAPA (बेकायदेशीर गतिविधियां रोकथाम अधिनियम) या कायद्यांवर आधारित दोन पुस्तके लिहिली आहेत.

Sachin waze | Sarkarnama

वाझे पुण्यात राहणार...

विशेष म्हणजे बडतर्फ पोलिस अधिकारी आता जामिनाबाहेर सचिन वाझे पुण्यात राहायला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Sachin waze | Sarkarnama

NEXT: क्रॉस वोटिंगमुळे पराभव, आता पुन्हा राज्यसभेचं तिकीट; माजी मुख्य सचिवांनी ढवळून काढले राजकारण

Alok Ranjan | Sarkarnama
येथे क्लिक करा...