एकनाथ शिंदेंचं अल्पसंख्यांक कार्ड : आजी-माजी आमदारांना मागे टाकून उमेदवारी मिळवलेले सईद खान कोण?

Jagdish Patil

एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी परभणी-हिंगोली मतदारसंघातून विधान परिषदेची उमेदवारी सईद खान यांना देत सर्वांनाच धक्का दिला आहे.

Eknath Shinde | Sarkarnama

सईद खान

याच पार्श्वभूमीवर पक्षातील दिग्गजांचा पत्ता कट करत शिंदेंनी उमेदवारी दिलेले सईद खान कोण आहेत ते जाणून घेऊया.

Saeed Khan Shivsena MLC Candidate | Sarkarnama

प्रदेशाध्यक्ष

खान हे सध्या शिवसेनेच्या अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष असून ते भावना गवळींचे विश्वासू मानले जातात.

Saeed Khan Shivsena MLC Candidate | Sarkarnama

जबाबदारी

2023 साली त्यांच्याकडे शिवसेनेच्या अल्पसंख्याक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती.

Saeed Khan Shivsena MLC Candidate | Sarkarnama

प्रवेश

त्यांच्या नेतृत्वात विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 900 अल्पसंख्याक लोकप्रतिनिधींनी शिवसेनेत प्रवेश केला.

Saeed Khan Shivsena MLC Candidate | Sarkarnama

निवडणूक

खान यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत रासप कडून निवडणूक लढवत तब्बल 55,000 मते घेतली होती.

Saeed Khan Shivsena MLC Candidate | Sarkarnama

सत्ता

2025 च्या नगरपरिषद निवडणुकीत त्यांनी पाथरी नगरपरिषदेवर शिवसेनेची एकहाती सत्ता आणली.

Saeed Khan Shivsena MLC Candidate | Sarkarnama

सदस्य

तर 2026 च्या ZP आणि पंचायत समिती निवडणुकीत त्यांनी पाथरी मतदारसंघातून 2 ZP तर 4 पंचायत समिती सदस्य निवडून आणले.

Saeed Khan Shivsena MLC Candidate | Sarkarnama

उमेदवारी

याच कामगिरीमुळे एकनाथ शिंदेंनी आता त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिल्याचं पाहायला मिळत आहे.

Saeed Khan Shivsena MLC Candidate | Sarkarnama

खोतकर

तर दुसरीकडे या जागेसाठी शिवसेनेचे नेते विप्लव बाजोरिया तसंच अर्जून खोतकर यांचा मुगला अभिमन्यू खोतकर देखील आग्रही होते.

Saeed Khan Shivsena MLC Candidate

NEXT : मंत्री विखे पाटलांची भेट अन् जरांगेंची माघार; मध्यरात्री नेमकं काय घडलं 'ते' PHOTO आले समोर...

Manoj Jarange Hunger Strike | Sarkarnama
क्लिक करा