Pradeep Pendhare
गुजरातच्या पालनपूरमधील सफीन हसन यांच्या नावावर भारतातील सर्वात युवा IPS अधिकारी होण्याचा विक्रम आहे.
2018 मध्ये वयाच्या 22 व्या वर्षी UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाले. UPSC आणि GPSC परीक्षेत बसले. 570 व्या क्रमांकाने UPSC लेखी परीक्षा उत्तीर्ण झाले.
23 डिसेंबर 2019 जामनगर येथे IPS प्रशिक्षणानंतर तिथेच पहिली पोस्टिंग सहाय्यक पोलिस अधीक्षक म्हणून मिळाली.
सफीन हसन यांचे प्राथमिक शिक्षण गुजराती माध्यम सरकारी शाळेत झाले. वयाच्या दहव्या वर्षी गावात आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांमुळे प्रभावित होत हसन यांनी अधिकारी व्हायचे ठरवले.
UPSC च्या चौथ्या पेपरवेळी हसल यांना अपघात झाला होता. पेपरच्या दिवाशी सकाळी 8.30 वाजता दुचाकी घसरल्याने त्यांचा गुडघा, कोपरा आणि डोक्याला दुखापत झाली.
पेपरनंतर एमआयआर केल्यावर गुडघ्याचे लिगामेंट तुटल्याचे आढळले. पायाच्या ऑपरेशनची गरज होती. मुलाखतीनंतर ऑपरेशन झाले.
UPSC मुलाखत मार्च 2018 मध्ये होती. 20 फेब्रुवारीपर्यंत हसन यांची तब्येत खूपच खराब झाली होती. तापानं फणफणले होते. तरी मुलाखतीला समोरे गेले.
सुनेची आई नसीब बेन यांनी आपल्या मुलाला दहावीपर्यंत शिक्षण देण्यासाठी 14 वर्षे लोकांच्या घरी काम केलं. वडील मुस्तफा इलेक्ट्रिशियन म्हणून काम करायचे.