Roshan More
भारताच्या लष्करी अधिकारी आणि सैन्याला प्रशिक्षण देणारी देहरादून येथील इंडियन मिलिटरी अकादमीच्या (IMA) आहे.
IMA च्या 93 वर्षांच्या इतिहासामध्ये प्रथमच एक मुलगी येथे प्रशिक्षण घेऊन पास झाली आहे.
कोल्हापूरमधी सई जाधव हिने या महिला ऑफिसर कॅडेटनं यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण करण्याचा मान मिळवला आहे.
कठोर शिस्त, अविरत परिश्रम आणि अढळ आत्मविश्वासाच्या बळावर सईने सहा महिन्यांचं अत्यंत आव्हानात्मक लष्करी प्रशिक्षण पूर्ण करून लेफ्टनंट पद प्राप्त केलं.
राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धात्मक परीक्षा, SSB मुलाखत आणि शारीरिक-मानसिक कसोटी यांवर मात करत सई जाधव हिनं हे यश मिळवत यशस्वीरित्या आपले प्रशिक्षिण पूर्ण केले.
सई जाधव हिचं हे यश लाखो तरुणींसाठी प्रेरणादायी आहे.
जाधव कुटुंबाची ही चौथी पिढी देशसेवेत आहेत. सईचे वडील संदीप जाधव हे भारतीय सैन्यात मेजर आहेत. तर तिच्या आजोबांनी देखील सैन्यात देशाची सेवा केली आहे.
Indian Army: आर्मीतील सर्वात मोठे पद कोणते? बलाढ्य अधिकारी कोण?