Rashmi Mane
नवीन टॅक्स रेजीममध्येही सॅलरीड कर्मचाऱ्यांना स्मार्ट पद्धतीने कर वाचवण्याचे पर्याय उपलब्ध आहेत.
कंपनीकडून मिळणारे मोबाईल, ब्रॉडबँड, मील वाउचर, स्किल कोर्सेस, यांचे री-इम्बर्समेंट घ्या. योग्य बिल सादर केल्यास करात सवलत मिळू शकते.
नियोक्त्याकडून NPS मध्ये दिलेले योगदान 80CCD(2) अंतर्गत करमुक्त असते. बेसिक पगाराच्या 14% पर्यंत नियोक्ता योगदान देऊ शकतो.
EPF मध्ये नियोक्त्याचे योगदान करमुक्त असते. VPF चा पर्याय निवडून आपण अतिरिक्त गुंतवणूक करू शकता आणि कर वाचवू शकता.
NPS + EPF मध्ये नियोक्त्याचे एकूण योगदान वर्षाला 7.5 लाखांपेक्षा जास्त नसावे.
EPF मध्ये कर्मचारी योगदान मर्यादा 2.5 लाख आहे.
FD ऐवजी आर्बिट्राज फंडात गुंतवणूक करा. एक वर्षानंतर मिळणाऱ्या लाँग टर्म गेनवर फक्त 12.5% कर लागतो.
वर्षाला 1.25 लाख पर्यंतचा लाँग टर्म गेन वेळोवेळी रिडीम करून पुन्हा गुंतवणूक केली तर कर कमी करता येतो.
जर तुमची प्रॉपर्टी भाड्याने दिली असेल, तर त्यावर घेतलेल्या होम लोनवरील व्याजाची कपात मिळू शकते. मात्र ही सवलत फक्त भाड्याने मिळणाऱ्या उत्पन्नाच्या मर्यादेतच लागू होईल.