Rashmi Mane
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. आठवा वेतन आयोग लागू होण्याआधीच सरकारने महागाई भत्त्यात (DA) वाढ करण्याची घोषणा केली आहे.
त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार त्वरित वाढणार असून त्याचा लाभ पुढील महिन्यापासून मिळणार आहे.
बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत केंद्र सरकारने महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवण्यात आला असून तो आता 58 टक्क्यांवर पोहोचला आहे.
सातव्या वेतन आयोगाखालील हा शेवटचा महागाई भत्ता असेल. त्यानंतर आठवा वेतन आयोग लागू होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पगारवाढीचा दुहेरी फायदा होणार आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना दरवर्षी जानेवारी आणि जुलै या दोन टप्प्यांत महागाई भत्ता दिला जातो. यंदा जुलै महिन्यातील वाढीचा निर्णय काहीसा उशिराने घेण्यात आला आहे.
त्यामुळे नोव्हेंबरपासून नव्या दराने महागाई भत्ता कर्मचाऱ्यांच्या पगारात समाविष्ट केला जाणार आहे. याचबरोबर, मागील तीन महिन्यांचा एरियरदेखील नोव्हेंबरमध्येच देण्यात येणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या खात्यात चांगली रक्कम जमा होणार आहे.
दरम्यान, सातव्या वेतन आयोगातील हा अखेरचा महागाई भत्ता असल्याने आठव्या वेतन आयोगाची उत्सुकता वाढली आहे.
केंद्र सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार आठवा वेतन आयोग जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. मात्र, काही कारणास्तव तो लांबणीवर गेला, तरी कर्मचाऱ्यांना त्याचा एरियर मिळेल असे स्पष्ट करण्यात आले आहे.