Salary of Finance Minister of India : देशाचा अर्थसंकल्प तयार करणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा पगार किती आहे?

Rashmi Mane

विकासकामांच्या घोषणा

मोदी सरकार 3.0 केंद्रीय अर्थसंकल्प 2024 आज सादर करण्यात आला. ज्यामध्ये विविध क्षेत्रातील विकासासाठी हजारो कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे.

Nirmala Sitharaman | Sarkarnama

अर्थसंकल्प

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थमंत्री म्हणून सातव्यांदा भारत सरकारचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला आहे.

Nirmala Sitharaman | Sarkarnama

ज्येष्ठ नेत्या

निर्मला सीतारमण या अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आहेत.

Nirmala Sitharaman | Sarkarnama

अर्थमंत्र्यांचा पगार

संपूर्ण देशाचा अर्थसंकल्प मांडणाऱ्या अर्थमंत्र्यांचा पगार किती आहे हे तुम्हाला माहिती आहे का? चला पाहुया.

Nirmala Sitharaman | Sarkarnama

निवृत्ती वेतन कायदा

इतर मंत्र्यांसह भारताच्या अर्थमंत्र्यांच्या पगाराची माहिती 'संसद सदस्यांचे भत्ते आणि निवृत्ती वेतन कायदा, 1954' मध्ये दिलेली आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. या कायद्यानुसार खासदाराला त्याच्या कार्यकाळात दरमहा एक लाख रुपये पगार मिळतो.

Nirmala Sitharaman | Sarkarnama

भत्ता

खासदार असण्याबरोबरच मंत्री म्हणूनही दररोज दोन हजार रुपये भत्ता मिळतो. संसदेच्या अधिवेशनासाठी किंवा इतर कोणत्याही कामासाठी प्रवास करण्यासाठी प्रवास भत्ता देखील मिळतो.

Nirmala Sitharaman | Sarkarnama

संपत्ती

pmindia.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध माहिती आणि अनेक अहवालांनुसार, अर्थमंत्री सीतारमण यांच्याकडे 1,15,38,000 रुपयांची संपत्ती आहे. यातील काही मालमत्ता त्यांच्या पतीकडे आहे.

Nirmala Sitharaman | Sarkarnama

सीतारमण यांच्यावरील कर्ज

प्रतिज्ञापत्रानुसार, निर्मला सीतारमण यांच्यावर 26.91 लाख रुपयांचे कर्ज आहे. प्रतिज्ञापत्रानुसार, 2022 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची एकूण संपत्ती 2.53 कोटी रुपये होती.

Nirmala Sitharaman | Sarkarnama

Next : तरुणांसाठी बजेटमध्ये काय? टॉप 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिप 

येथे क्लिक करा