Kajal Nishad : भाजपच्या रवीकिशन यांच्यासमोर तगडं आव्हान उभं केलेल्या 'सपा'च्या काजल निषाद...!

Deepak Kulkarni

अभिनेत्री आणि राजकारणी

काजल निषाद ही एक भारतीय अभिनेत्री आणि राजकारणी आहे.

Kajal Nishad | Sarkarnama

जन्म

अभिनेत्री काजलचा जन्म 1 जून 1982 रोजी झाला आहे.

Kajal Nishad | Sarkarnama

मालिका आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये काम

तिने अनेक टीव्ही मालिका आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Kajal Nishad | Sarkarnama

पालक मुंबईत स्थायिक..

तिचे पालक कच्छ गुजरातचे असून ते मुंबईत स्थायिक झाले आहेत .

Kajal Nishad | Sarkarnama

भोजपुरी चित्रपट निर्मात्याशी लग्न

काजलचे लग्न गोरखपूर जिल्ह्यातील भाऊपार गावातील भोजपुरी चित्रपट निर्माता संजय निषाद यांच्याशी झाले आहे .

Kajal Nishad | Sarkarnama

2012 काँग्रेसकडून लढवली निवडणूक..

तिने 2012 ची उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक गोरखपूर (ग्रामीण) मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीवर लढवली होती.

Kajal Nishad | Sarkarnama

आदित्यनाथांच्या बालेकिल्लात उमेदवारी...

यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला असलेल्या गोरखपूरमधून सपाने त्यांना उमेदवारी दिली आहे. 

Kajal Nishad | Sarkarnama

काजल निषाद या काँग्रेसमध्ये सक्रिय राजकारण करत होत्या. पण, 2021 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडली आणि समाजवादी पक्षाचे सदस्यत्व घेतले. 

Kajal Nishad Vs Akhilesh Yadav | Sarkarnama

रवीकिशन आणि काजल निषाद यांच्यात लढत..

उत्तर प्रदेशातील गोरखपूर मतदारसंघातून पुन्हा एकदा भाजपची उमेदवारी मिळवलेल्या रवीकिशन यांच्यासमोर यंदा समाजवादी पार्टीच्या अभिनेत्री काजल निषाद यांनी तगडं आव्हान उभं केलं आहे.

Kajal Nishad Vs Ravikishan | Sarkarnama

NEXT अन्सार शेख, टीना डाबीनंतर येवल्याच्या प्रियंका मोहितेचा रेकॉर्ड; कितव्या वर्षी झाली IPS ?